गडचिरोली येथे राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

103

गडचिरोली येथे राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

गडचिरोली :- श्री. द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था, आरमोरी व संताजी स्मृती प्रतिष्ठान, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२ वाजता झालेल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका योगिता प्रमोदजी पिपरे उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनात बोलताना त्यांनी सांगितले की, अशा मेळाव्यांमुळे समाजातील सुशिक्षित युवक-युवतींना एकत्र येऊन योग्य जोडीदार निवडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकरजी वासेकर होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोदराव पिपरे यांनी मत व्यक्त केले की अशा उपक्रमांमुळे वेळ व पैशाची बचत होते आणि समाजातील नाती अधिक दृढ होतात. ते महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासंघ चे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित, पुणे चे संचालक आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवाजी सोनटक्के, शिलाताई सोमनकर, भैयाजी सोमनकर, विलास अड़कीने उपस्थित होते. तसेच नगरपरिषद गडचिरोली चे पदाधिकारी, अधिवक्ते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, व्यापारी व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या मेळाव्यात चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १०० वधू-वरांनी सहभाग नोंदविला. पालकांसह सुमारे ३०० जण उपस्थित होते. वधू-वरांनी स्वतःचा परिचय देत संवाद साधला.
कार्यक्रमाचे आयोजन Wadhuwar Parichay OPC Pvt. Ltd. चे अध्यक्ष द्वारकाप्रसाद सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पितांबर कुकडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपीचंद बोदलकर यांनी केले.
उपस्थितांनी अशा उपक्रमांमुळे समाजातील युवक-युवतींना योग्य संधी उपलब्ध होत असून भविष्यातही असे मेळावे नियमित आयोजित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here