नंदनवन नगरात माऊली माता मंदिर परिसरात बोअरवेलची मागणी

151

नंदनवन नगरात माऊली माता मंदिर परिसरात बोअरवेलची मागणी

नवेगाव (मुरखळा), दि. 22 एप्रिल २०२६ :
नवेगाव येथील मौजा नंदनवन नगर, वार्ड क्रमांक ३ मधील माऊली माता मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी बोअरवेल उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या सौ. भुषणा किशोर खेडेकर यांनी स्थानिक आमदारांकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनानुसार, नंदनवन नगर परिसरात एसबीआय बँक शाखेजवळील माऊली माता मंदिरात पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. मंदिरात नियमित पूजा-अर्चा, स्वच्छता तसेच भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज भासत आहे.
सौ. खेडेकर यांनी सांगितले की, सन २०२४ मध्ये स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मंदिराचे बांधकाम करून मातीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मात्र, पाण्याअभावी मंदिरातील धार्मिक उपक्रम व स्वच्छता यावर परिणाम होत आहे.
तसेच, मंदिराचे बांधकाम सुरू असताना संबंधित आमदारांनी मंदिरासाठी आवश्यक सोयी-सुविधा व बोअरवेल उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता त्या आश्वासनाची पूर्तता करून मंदिर परिसरात तातडीने बोअरवेल उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीमुळे वार्ड क्रमांक ३ मधील नागरिक व भक्तांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here