गडचिरोली नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी निवड शहरात जल्लोष, भाजपाचा शक्तीप्रदर्शन

175

गडचिरोली नगरपरिषद निवडणूक 2025 :

शहरात जल्लोष, भाजपाचा शक्तीप्रदर्शन

 

गडचिरोली, दि. १८ नोव्हेंबर :
गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तरुण व उच्चशिक्षित नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांना नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. काल सोमवारी त्यांच्या नामांकन अर्जाचा भव्य रॅलीने जल्लोषात दाखल करण्यात आला.

शहरातील प्रमुख मार्गांवर भाजपाचे झेंडे, ढोल-ताशे, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि युवकांचा उत्साह यामुळे वातावरण दणाणून गेले होते. भाजपाच्या सर्व नगरसेवक उमेदवारांनीही या सत्रात आपले नामांकन दाखल केले.

भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी सांगितले की, “प्रणोती निंबोरकर या तरुण, अभ्यासू आणि उत्साही नेतृत्वामुळे गडचिरोली शहराच्या विकासाला नव्या गतीने चालना मिळेल. पक्षाने घेतलेला निर्णय योग्य असून शहराची जनता भाजपावर विश्वास दाखवेल.”

यावेळी चिमुरचे आमदार आणि जिल्हा निवडणूक प्रभारी किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी प्रणोती निंबोरकर यांच्या उमेदवारीचे स्वागत केले.

रॅलीच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपाने ताकद दाखवत आगामी निवडणुकीला जोरदार सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here