गडचिरोली दि १८ नोंव्हेबर :-येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी आघाडी करून संयुक्त उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगराध्यक्ष पदाची उमेदवारी बिपाशा नागनाथ (राजू) भुसारे यांना देण्यात आली असून, आघाडीचे एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काही इच्छुक उमेदवारांना वेळेवर दस्तावेज पूर्ण न करू शकल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करता आला नसला, तरी हे सर्व इच्छुक पक्षासाठी जोमाने काम करणार असल्याचे गण्यारपवार यांनी स्पष्ट केले.
गडचिरोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते, तसेच मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते असून, सर्व कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी एकदिलाने मेहनत घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आघाडीतून राष्ट्रवादीचे १२ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत.
पत्रकार परिषदेला अॅड. संजय ठाकरे, उदवसेनेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, रा.कॉ. ओबीसी आघाडीचे शेमदेव चाफले, उमेदवार बिपाशा भुसारे, नंदू कुमरे, अमोल गण्यारपवार, एजाज शेख, करण गण्यारपवार, नागनाथ भुसारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

—
बॉक्स : बिपाशा भुसारे — सर्वात कमी वयाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी गडचिरोली नगराध्यक्षपदाची उमेदवारी २२ वर्षीय बिपाशा नागनाथ भुसारे यांना जाहीर केली आहे. या निवडणुकीत उतरलेल्या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. सामाजिक क्षेत्रातील आवड असलेल्या बिपाशा यांनी पुणे येथून वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे.
—
🔹 प्रभागनिहाय उमेदवार जाहीर
प्रभाग क्र. १ (ब) : प्रशांत शामराव आखाडे
प्रभाग क्र. २ (अ) : पवन राघो गेडाम
प्रभाग क्र. २ (ब) : सुनीता प्रभाकर नैताम
प्रभाग क्र. ४ (अ) : भावना अतुल हजारे
प्रभाग क्र. ४ (ब) : हिमांशू विश्वासराव देशमुख
प्रभाग क्र. ५ (अ) : करिष्मा गजानन भैसारे
प्रभाग क्र. ५ (ब) : राकेश विनायक रत्नावार
प्रभाग क्र. ६ (अ) : सुलभा सुभाष कावळे
प्रभाग क्र. ६ (ब) : मंगला राजेश भट्टलवार
प्रभाग क्र. ७ (अ) : अपर्णा अनिल खेवले
प्रभाग क्र. ८ (ब) : सचिन दिवाकर येणप्रेडीवार
प्रभाग क्र. १२ (अ) : आशा मुकेश मेश्राम
प्रभाग क्र. १२ (ब) : चंद्रशेखर नरेंद्र नैताम
प्रभाग क्र. १३ (अ) : तुळशीराम रुषी सहारे
प्रभाग क्र. १३ (ब) : पूजा पंकज जावादे
प्रभाग क्र. १३ (क) : मीनाताई सुरेश बोभाटे
—
आघाडीची ही संयुक्त यादी जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरणात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीत या उमेदवारांच्या कामगिरीवर आणि जनसमर्थनावर सर्वांचे लक्ष लागले आहे.













