
कारच्या धडकेत दुचाकी जळुन खाक ,दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी

गडचिरोली :-Gadchiroli-Armori deulgao आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथे पेट्रोल पंप जवळ कार ची दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीने पेट घेतला व दुचाकी जळुन खाक झाली. या. अपघातात दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना दिनांक 3एप्रिल सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. क्रेटा कार क्रमांक MH 32 AH 6677 ही आरमोरी वरून गडचिरोली कडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला. धडक दिली यात दुचाकीने पेट घेतला व दुचाकी जळुन खाक झाली. दुचाकीवर तिघे जण स्वार होते. हे तिघे जण गंभीर जखमी झाले. यात सोमेश्वर बावणे वय 52 वर्ष, गणेश नवघरे रा. गणेशपुर सिर्सी व अन्य एक जण गंभीर जखमी झाले. यात कारचा दर्शनी भाग चेंदा मेंदा झाला. कारमधील. कुणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती कळताच आरमोरी पोलिस घटनास्थळी पोहोचले व जखमीना तातडीने गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी तातडीने पाठविण्यात आले.