Ram Navami is celebrated with enthusiasm at Shri Lakshmi Narayan Temple The presence of former mayor Yogitatai Pipre and former corporator Pramodji Pipre

59

श्री लक्ष्मी नारायण मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी

माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांची उपस्थिती

 

Gadchiroli गडचिरोली :- दि. 31 मार्च

श्रीराम उत्सव समिती व स्वामी श्री लक्ष्मी नारायण मंदिर समिती,सर्वोदय वार्ड गडचिरोलीच्या वतीने रामनवमी निमित्य प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे व माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांनी स्वामी लक्ष्मी नारायण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. व पूजा केली. यावेळी ऍड प्रशांत आखाडे, अनुप कत्रोजवार व वार्डातील प्रतिष्ठित नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    यावेळी वार्डातुन श्रीरामाच्या झाकीची भव्य मिरवणूक काढण्यात आली व भाविकांच्या मनोरंजनासाठी गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी भाविकांना मार्गदर्शन करून त्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here