राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी गडचिरोलीत बेमुदत संप; काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा जाहीर पाठिंबा

97

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी गडचिरोलीत बेमुदत संप; काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा जाहीर पाठिंबा

वर्षा भाजीपाले कार्यकारी संपादक

गडचिरोली : दि.10 ऑगस्ट :-राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी दि. 19 ऑगस्ट 2025 पासून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सुरू असलेल्या बेमुदत संपाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व मागण्यांच्या पूर्ततेसाठी शक्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी कोरोना महामारीतसुद्धा अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून सेवा दिली. आजही दुर्गम भागात रस्ते पोहोचले नसताना हे कर्मचारी घराघरांत जाऊन आरोग्यसेवा पोहोचवत आहेत. परंतु शासनाकडून योग्य दखल घेतली जात नसल्याने कर्मचारी संपावर जाण्यास भाग पडले आहेत.

सध्या जिल्ह्यात डेंगू, मलेरिया, टायफॉईडसारख्या आजारांचे रुग्ण वाढत असून, आरोग्य व्यवस्था विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असूनही शेकडो कर्मचारी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत, ही बाब अत्यंत दुःखद असल्याचे ब्राह्मणवाडे यांनी सांगितले. शासनाने तातडीने मागण्यांची पूर्तता करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, आरोग्य सेवा पूर्णपणे खंडित होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी शक्य तितकी जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी जिल्हाध्यक्षांसोबत गडचिरोली तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंत राऊत, श्रीनिवास ताटपल्लीवार तसेच इतर काँग्रेस पदाधिकारी व मोठ्या संख्येने संपकरी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here