‘चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार-२०२५’ या घोषणेअंतर्गत महिला महाविद्यालय, गडचिरोली येथे राष्ट्रीय पोषण सप्ताह कार्यक्रम
वर्षा भाजीपाले कार्यकारी संपादक
गडचिरोली : दि 10 ऑगस्ट श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था संचालित महिला महाविद्यालय, गडचिरोली येथील गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय पोषण सप्ताह-२०२५’ उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शिका जी.एस.पी.एम. महाविद्यालय, धानोरा येथील गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विणा जंबेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आरोग्य म्हणजे फक्त रोगाचा अभाव नसून शारीरिक व मानसिक सुदृढता हाच खरा आरोग्याचा अर्थ आहे.
राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा उद्देश बालक, किशोरवयीन मुले, गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता यांच्यात पोषणाविषयी जनजागृती करून रक्तक्षय, कमी वजनाची समस्या व कुपोषणावर मात करणे हा आहे, असे त्यांनी नमूद केले.
आजच्या काळात दोन प्रकारचे कुपोषण दिसून येते – एक म्हणजे अन्नाच्या अभावामुळे होणारे कुपोषण आणि दुसरे म्हणजे फास्टफूड व जंकफूडच्या आहारी गेलेल्या पिढीचे कुपोषण. यावर मात करण्यासाठी संतुलित आहार व पोषणतत्वांविषयी जागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कीर्ती पुल्लकवार यांनी केले. संचालन प्रा. डॉ. दर्शना खेवले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रूपाली आगलावे यांनी मानले.
या प्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कुंदन दुफारे, डॉ. प्रज्ञा त्रिपाठी, प्रा. डॉ. प्रमोद बोधाने, प्रा. डॉ. अनिल चहांदे, प्रा. डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. ज्योत्स्ना राऊत, प्रा. गायत्री गुरव, प्रा. विवेक येमजेलवार, प्रा. साईनाथ कोडजावरे, प्रा. मारोती वाघधरे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.













