गडचिरोलीत रंगणार ‘ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र’ सिझन – 2
सिनेतारका माधुरी पवार यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मान – फॅशन, मेकअप, मेहंदी व मॉडेलिंग स्पर्धांचा अनोखा मेळावा
वर्षा भाजीपाले कार्यकारी संपादक
गडचिरोली : गडचिरोलीत कला, सौंदर्य व फॅशनचा अनोखा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. जे.टी.एम. स्टार इव्हेंटच्या वतीने “ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र” सिझन – २ या भव्य पुरस्कार सोहळा व फॅशन शो / मॉडेलिंग स्पर्धा तसेच मेकअप आणि मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी, शुक्रवार सकाळी 11.00 वाजता सुमानंद हॉल, गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमात विजेत्यांचा गौरव लोकप्रिय सिनेतारका माधुरी पवार यांच्या शुभहस्ते होणार असून, गडचिरोलीकरांसाठी हा क्षण संस्मरणीय ठरणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन प्रसिद्ध मॉडेल ज्योती उंदीरवाडे चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होत असून, राज्यभरातील विविध कलाकार, मॉडेल्स व रसिक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
( फॅशन, कला आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचा सुंदर संगम असलेला हा सोहळा गडचिरोलीच्या वैभवात नवी भर घालणार आहे)













