जिल्हा दिव्यांग तक्रार निवारण समितीची बैठक १६ जून रोजी — समस्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

105

जिल्हा दिव्यांग तक्रार निवारण समितीची बैठक १६ जून रोजी — समस्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

गडचिरोली, दि. १३ : जिल्ह्यातील दिव्यांग नागरिक तसेच जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दिव्यांग तक्रार निवारण समितीची बैठक दिनांक १६ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

 

सदर सभा जिल्हा परिषद सभागृहात सकाळी १०.३० वाजता घेण्यात येणार असून, यामध्ये दिव्यांग बांधवांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा, सवलती, सामाजिक सुरक्षेच्या योजना तसेच सार्वजनिक सुविधा यासंबंधी येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. शेखर शेलार यांनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आपल्या अडचणी, समस्या आणि सूचना घेऊन वेळेवर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here