कुरखेडा भुमी अभिलेख कार्यालय, कुरखेडा येथील मुख्यालय सहायक यांचेवर अँन्टी करप्शन ब्युरोची कारवाई

201

कुरखेडा भुमी अभिलेख कार्यालय, कुरखेडा येथील मुख्यालय सहायक यांचेवर अँन्टी करप्शन ब्युरोची कारवाई

गडचिरोली :- भुमी अभिलेख कार्यालय कुरखेडा, ता. कुरखेडा, जिल्हा गडचिरोली येथील मुख्यालय सहायक, रवींद्र सदाशिव दिनकोंडावार, वय-४२ वर्षे, (वर्ग-३) यांनी तक्रारदारास १,००,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोड अंती ७०,०००/- रू रंगेहात स्विकारतांना अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने आज आज रोजी ताब्यात घेतले.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी लोकसेवक श्री. रवींद्र सदाशिव दिनकोंडावार यांनी तक्रारदारास शेतजमिनीचा पोटहीसा मोजणी व सातबारा वेगळा करून देण्यासाठी चालन काढुन देण्याचे कामाकरीता १,००,०००/. रूपयाची मागणी केली असता तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली. सदर तकार प्राप्त झाल्यानंतर दिनांक ०५/०८/२०२५ रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक श्री. रवींद्र सदाशिव दिनकोंडावार यांनी तक्रारदारास शेत जमिनीचा पोटहीसा मोजणी व सातबारा वेगळा करून देण्यासाठी चालन काढुन देण्याचे कामाकरीता १,००,०००/. रूपये लाचेची मागणी केली व दिनांक ०६/०८/२०२५ रोजी तडजोड अंती ७०,०००/- रू लाच रक्कम स्विकारतांना अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

 

पोलीस उपअधिक्षक श्री. चंद्रशेखर पी. ढोले, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पो.नि. संतोष पाटील व टिम यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले व श्री. रवींद्र सदाशिव दिनकोंडावार यांनी तक्रारदारास शेत जमिनीचा पोटहीसा मोजणी व सातबारा वेगळा करून देण्यासाठी चालन काढुन देण्याचे कामाकरीता १,००,०००/. रूपये लाचेची मागणी करून दिनांक ०६/०८/२०२५ रोजी तडजोड अंती ७०,०००/- रू लाच रक्कम स्विकारल्याने त्यांचे विरूध्द पोस्टे, कुरखेडा, जिल्हा-गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी श्री. रवींद्र सदाशिव दिनकोंडावार वय ४२ वर्ष, पद-मुख्यालय सहायक, यांचे घराची अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली चमु कडून झडती घेण्यात आली.

 

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सागर कवडे, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, श्री. सचिन कदम अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक श्री. चंद्रशेखर पी. ढोले यांचे पर्यवेक्षणात पो.नि. संतोष पाटील, सफौ सुनील पेददीवार, पोहवा/राजेश पदमगिरीवार, किशोर जौजांरकर, स्वप्नील बांबोळे, पो.अं. संदीप उडान, संदिप घोरमोडे, प्रविण जुमनाके, हितेश जेटटीवार, मपोअं/ विद्या मशाखेत्री, जोत्सना वसाके व चापोहवा / राजेश्वर कुमरे, चापोशि/चापले सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.

गडचिरोली जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली यांचेशी सपंर्क साधावे असे आवाहन पोलीस उपधिक्षक चंद्रशेखर ढोले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here