गडचिरोलीत आदिवासी युवकांसाठी सौर ऊर्जा प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

203

गडचिरोलीत आदिवासी युवकांसाठी सौर ऊर्जा प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

 

गडचिरोली :- आदिवासी युवकांसाठी सौर ऊर्जा प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींसाठी रोजगाराभिमुख उपक्रमांतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाअंतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ तर्फे पुरस्कृत एकलव्य कुशल योजना अंतर्गत सौर ऊर्जा तंत्रज्ञान (Solar Energy Technician) या विषयाचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून स्वावलंबी बनवणे हा आहे. आजच्या काळात उर्जेची वाढती गरज लक्षात घेता सौर ऊर्जेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले असून, या क्षेत्रात रोजगाराच्या विपुल संधी निर्माण होत आहेत.
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
पूर्णतः मोफत प्रशिक्षण (निशुल्क)
निवास व भोजनाची सोय उपलब्ध
प्रायोगिक व तांत्रिक मार्गदर्शन
प्रशिक्षणानंतर रोजगारासाठी सहाय्य
सौर ऊर्जा क्षेत्रातील करिअर संधी
पात्रता
🔹 आदिवासी (ST) प्रवर्गातील उमेदवार
🔹 वयोगट : १८ ते ४५ वर्षे
🔹 गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवती
संपर्क व प्रवेश प्रक्रिया
सदर प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी अधिक माहितीसाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:
श्री. देविचंद मेश्राम
प्रकल्प अधिकारी, मिटकॉन गडचिरोली
संपर्क क्रमांक : 8698948786
ऊर्जा ही काळाची गरज असून सौर ऊर्जा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या प्रशिक्षणाद्वारे आदिवासी युवक-युवतींना कौशल्यविकासासोबतच रोजगाराच्या दिशेने सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here