सामान्य लोकांचा सामान्य माणूस : प्रमोद भाऊ पिपरे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

गडचिरोली | प्रतिनिधी दि १३ डिसेंबर :- सामान्य जनतेतून आलेले आणि सदैव समाजासाठी कार्यरत असलेले मा. श्री. प्रमोदजी भाऊ पिपरे (भाजपा लोकसभा समन्वयक तथा संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे; जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघ, जिल्हा गडचिरोली; माजी सभापती, नगरपरिषद गडचिरोली) यांनी आपला वाढदिवस नेहमीप्रमाणे साधेपणाने व समाजभान जपत साजरा केला.
शनिवार, दि. 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी त्यांनी सहपत्नीस सेमनादेवस्थान येथे पूजाअर्चा करून दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर निवासी अपंग विद्यालय, लांजेडा (स्नेहनगर) येथे भेट देत अपंग विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
यावेळी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच केक व लाडू देण्यात आले. “आपला आनंद समाजातील गरजू घटकांसोबत वाटण्यातच खरे समाधान आहे,” या भावनेतून प्रमोदभाऊंनी आपला वाढदिवस अपंग विद्यार्थ्यांसोबत साजरा करून ‘सामान्य माणसाची’ आपली ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली.

या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्ष सौ. योगिता प्रमोदजी पिपरे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी भाजपा गडचिरोली; मा. रमेशजी भूरसे, प्रदेश सचिव किसान आघाडी भाजपा; मा. अनुराग पिपरे, संचालक पिपरे पेट्रोलपंप, गडचिरोली; सौ. कविताताई उरकुडे, जिल्हाउपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी; सौ. रोशनी बानमारे, कोषाध्यक्ष शहर महिला आघाडी गडचिरोली; श्रीमती पूनम हेमके, शहर अध्यक्ष (NTVJ); राजू शेरकी, दिनेश भूरसे, लोकेश पिपरे, संकेत सेलोटे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक भास्कर दोनाडकर, अधीक्षक उमेश देशमुख व अपंग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा हा वाढदिवस गडचिरोलीकरांच्या मनात विशेष ठसा उमटवून गेला.













