श्री संत जगनाडे महाराज जयंती महाउत्सवाचे आयोजन २७ डिसेंबरला गडचिरोलीत; नियोजन बैठकीत महत्त्वाचे निर्णय

109

श्री संत जगनाडे महाराज जयंती महाउत्सवाचे आयोजन २७ डिसेंबरला गडचिरोलीत; नियोजन बैठकीत महत्त्वाचे निर्णय

शहर प्रतिनिधी

गडचिरोली, दि. १७ डिसेंबर २०२५ —
श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती महाउत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी येत्या २७ डिसेंबर २०२५ रोजी गडचिरोली येथील संताजी सभा गृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाउत्सवाच्या यशस्वी आयोजनाबाबत रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी एक महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली.

या बैठकीत जयंती महाउत्सवाचे स्वरूप, कार्यक्रमाची रूपरेषा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, तसेच समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग कसा वाढवता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान महाउत्सव नियोजनाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या नियोजन बैठकीला गडचिरोली शहर व परिसरातील तेली समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोदजी पिपरे, संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रभाकर वासेकर, संताजी सोशल मंडळ, गडचिरोलीचे अध्यक्ष प्रा. देवानंद कांमडी, विदर्भ तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेशजी भांडेकर, देवाजी सोनटक्के, ॲड. रामदासजी कुंनघाडकर, माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय रमेशजी भुरसे, विठ्ठलराव कोठारे, गोपीनाथजी चांदेवार, व्यंकटेश सोमणकर, वंदनाताई सोमणकर, पुष्पाताई करकाडे, शालिनीताई कामडी, मुक्तेश्वर काटवे, लिलाधर भरडकर, बालाजी भांडेकर, विजय भांडेकर, राजू भरडकर, संजय खोब्रागडे, विलास निंबोरकर, संतोष चिलबुले, शरद निबोरकर, सुधाकर दुधबावरे, बालाजी भुरले, विष्णू कामडे, अनिल कोठारे, चंद्रकांतजी कोठारे, चंद्रकिशोर किरमे, रवींद्र कामडी, बंडू चिलबुले, रमेश कामडी, निलेश सातपुते तसेच तेली समाजातील अनेक प्रतिष्ठित समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बैठकीत बोलताना उपस्थित मान्यवरांनी संत जगनाडे महाराज यांच्या विचारांचा व कार्याचा समाजावर झालेला प्रभाव अधोरेखित केला. जयंती महाउत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, युवक प्रबोधन आणि संतांच्या विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा, असा सर्वांचा एकमुखी सूर होता.

या महाउत्सवात गडचिरोली जिल्ह्यातील तसेच परिसरातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here