साताऱ्यातील पूरग्रस्त कुटुंबांना लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनचा मदतीचा हात

129

साताऱ्यातील पूरग्रस्त कुटुंबांना लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनचा मदतीचा हात

वर्षा भाजीपाले कार्यकारी संपादक

गडचिरोली/सातारा (२ सप्टेंबर) : मुसळधार पाऊस, वाढलेली पाणीपातळी आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. अनेक कुटुंबे विस्थापित झाली असून त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.

 

या कठीण परिस्थितीत लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची सीएसआर शाखा असलेल्या लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशन (एलआयएफ) ने पुढाकार घेत पूरग्रस्त कुटुंबांना आवश्यक मदत साहित्य पुरवण्यास सुरुवात केली आहे.

 

२५ ऑगस्टपासून एलआयएफ टीमने पाटण तालुक्यातील बाधित कुटुंबांसाठी ३,००० हून अधिक मदत किट तयार केली आहेत. प्रत्येक किटमध्ये ब्लँकेट, तांदूळ, तेल, डाळ, कणिक, मसाले, साबण, टूथपेस्ट आणि पिण्याच्या पाण्याचे कॅन यांचा समावेश आहे.

 

१ सप्टेंबरपर्यंत १२ ट्रकमधून २,५४६ क्रेट नागपूरहून साताऱ्यात पोहोचवण्यात आले असून हे साहित्य कोनसरी येथील लॉईड्स मेटल्सची सीएसआर टीम स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पूरग्रस्तांना वितरित करत आहे.

 

या उपक्रमाबाबत एलआयएफच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “लोकांच्या सर्वात कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे प्राधान्य आहे. साताऱ्यातील कुटुंबांना मदत करण्यासाठी हे एक छोटेसे पाऊल आहे. आमची टीम गरजूंना मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहील.”

संवेदनशीलता आणि जबाबदारीने समाजोपयोगी काम करण्याची परंपरा कायम ठेवत लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनने पुन्हा एकदा आपले सामाजिक उत्तरदायित्व जपले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here