आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढणार – धर्मराव बाबा आत्राम

95

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढणार – धर्मराव बाबा आत्राम

NCP (Ajit Pawar group) will contest the upcoming local body elections on its own – Dharmarao Baba Atram

रंजित  बनकर प्रतिनिधी

आरमोरी ( Gadchiroli) : गडचिरोली जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) स्वबळावर लढवणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री व अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.

 

ते ५ सप्टेंबर रोजी आरमोरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सुमारे १५ जिल्हा परिषद क्षेत्रांसह सर्व पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांत पक्ष स्वबळावर उतरणार आहे. तसेच आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांतही पक्षाचे उमेदवार उतरवले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

आत्राम म्हणाले, “आपण तालुकानिहाय दौरे करून संघटन मजबूत करत आहोत. ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहेत तिथे स्नेही लढत होईल; मात्र युती न झाल्यास स्वतंत्रपणे लढत देऊ. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका माझ्या नेतृत्वात लढल्या जातील.”

 

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, शरद पवार गटाने निवडणुका लढवल्या तरी त्याचा परिणाम महायुतीवर होणार नाही.

 

या पत्रकार परिषदेला माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जिल्हा परिषद सभापती कल्पना तिजारे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अरीफ पटेल, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर तलमले, सहप्रमुख सुनील नंदनवार, तालुकाप्रमुख संजय साळवे (वडसा), क्रांती किरामी (कोरची), राम लाजेवार (कुरखेडा), कार्याध्यक्ष बौद्धकुमार लोणारे, शहराध्यक्ष लतीफ शेख (देसाईगंज), प्रदीप हजारे (आरमोरी), महिला तालुकाध्यक्ष संगीता मेश्राम, शहराध्यक्ष जयश्री भोयर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here