संपूर्णत: अभियान सन्मान सोहळा आणि आकांक्षा हाट चे आयोजन
Entire campaign honoring ceremony and Akanksha Haat organized
गडचिरोली दि. २९ : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत संपूर्णत: अभियान सन्मान सोहळा आणि आकांक्षा हाट चे उद्घाटन बुधवार, ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता येथील आरमोरी रोडवरील सुमानंद सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून वित्त व नियोजन ,कृषी, मदत व पुनर्वसन,विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, खासदार डॉ.नामदेव किरसान, आमदार सर्वश्री अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, धर्मरावबाबा आत्राम, डॉ.मिलिंद नरोटे व रामदास मसराम तसेच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे suhas gade यांनी कळविले आहे.













