Two women died during cesarean section at District General Hospital Gadchiroli

110

जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे सिजर करतान दोन महिलांचा मृतु

गडचिरोली, gadchiroli hospital : येथील महिला व बाल रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झालेल्या दोन महिलांचा अकस्मात मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. जंतुसंसर्गामुळे दोघींचाही मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज असून, मृतकांच्या नातेवाईकांनीही उपचारात हयगय झाल्यामुळे दोघींनाही जीव गमवीला असल्याची माहीती ऊपलब्ध आहे. यात   Rajani prakash gedam bhansi रजनी प्रकाश शेडमाके (23) रा. भानसी, ता. सावली, जि. चंद्रपूर तर  ujjwala naresh bure murkhala  उज्ज्वला नरेश बुरे 22),रा.मुरखळा चक,ता. चामोर्शी  सध्याचे निवास  इंदिरानगर, गडचिरोली) अशी मृत महिलांची नावे आहेत. या दोघींना प्रसूतीसाठी 24 सप्टेंबरला महिला व बाल रुग्णालयात भरती करण्यात आले. तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी दोघींचीही शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. मात्र, रजनी शेडमाके हिला ताप, दमा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला, तर उज्ज्वला बुरे हिला ताप आणि अतिसाराची लागण झाली. प्रकृती खालावल्याने 27 सप्टेंबरला दोघींनाही जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, संध्याकाळी रजली शेडमाके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उज्ज्वला बुरे हिला नागपूरला रेफर करण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, नागपूरला नेण्यात येत असताना रात्री 11 वाजताच्या सुमारास आरमोरीजवळ उज्ज्वला बुरे हिनेही प्राण सोडला. दोघींचेही बाळ सुखरुप आहेत. परंतु आईविना दोघेही पोरके झाले आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही महिलांना जीव गमवावा लागल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे..

चौकशी समितीच्या अहवालानंतर सत्य कळेल: डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्यचिकित्सक

दोन महिलांचा मृत्यू जंतुसंसर्गाच्या धक्क्यामुळे (सेप्टीसेमिक शॉक) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, कारण जाणून घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली चार तज्ज्ञांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल. यात कुणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्या कडुन प्राप्त झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here