निधन वार्ता:-ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ शंकरराव पिपरे यांचे निधन

61

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ शंकरराव पिपरे यांचे निधन

गडचिरोलीत शैक्षणिक क्षेत्रात शोककळा

 

गडचिरोली : येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, वसंत विद्यालयाचे सेवा-निवृत्त शिक्षक तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांचे वडील श्री. शंकरराव बालाजी पिपरे यांचे मंगळवार, दि. 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी ते 90 वर्षांचे होते.
स्व. शंकरराव पिपरे यांनी आपल्या प्रदीर्घ अध्यापन कारकिर्दीत शेकडो विद्यार्थ्यांना घडवून शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. साधेपणा, शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांविषयी असलेली आपुलकी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये होती. शिक्षक म्हणूनच नव्हे तर एक आदर्श व्यक्ती म्हणूनही ते ओळखले जात होते.
त्यांच्या निधनाने गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात पुत्र माजी नगरसेवक श्री. प्रमोद पिपरे, श्री. अनिल पिपरे, नातू श्री. अनुराग पिपरे, श्री. ऋषिकेश पिपरे, श्री. लोकेश पिपरे, सून नगरसेविका योगिता पिपरे (माजी नगराध्यक्ष, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष) तसेच मोठा आप्तेष्ट परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवार, दि. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत गडचिरोली येथील रेडी गोडाऊनजवळील निवासस्थानापासून निघणार असून वैनगंगा नदीच्या स्मशानभूमीत (बोरमाडा घाट) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
— शोकाकुल पिपरे परिवार, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here