Inauguration of Laboratory in Gondwana University The laboratory will enhance the academic progress of the students; Vice-Chancellor Dr. Prashant Bokare

123

Inauguration of Laboratory in Gondwana University The laboratory will enhance the academic progress of the students; Vice-Chancellor Dr. Prashant Bokare

गोंडवाना विद्यापीठात प्रयोगशाळाचे उद्घाटन प्रयोगशाळेमुळे विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत भर पडेल;कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

गडचिरोली(Gadchiroli-Gondwana university)दि:४ विद्यापीठात सुरू झालेली ही प्रयोगशाळा म्हणजे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीतले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. विद्यापीठात जागेच्या अभावामुळे यापूर्वी प्रयोगशाळा नव्हती.त्यामुळे विद्यार्थ्यांना शासकीय विज्ञान महाविद्यालयात जावे लागायचे. आता वेळ आणि श्रम या दोहोंची बचत होणार. विद्यार्थी अधिक जोमाने अभ्यास करतील त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत देखील भर पडेल.असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.गोंडवाना विद्यापीठाच्या रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र   विषयाच्या प्रयोग शाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र देव ,मॉडेल कॉलेजचे समन्वयक डॉ. संदीप लांजेवार यांची उपस्थिती होती.कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात पदव्युत्तर शैक्षणिक विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुसज्ज आणि प्रशस्त अशी ही रसायनशास्त्र तसेच भौतिक शास्त्र विषयाची प्रयोगशाळा सुरु करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. रोशन नासरे, प्रा. मिथुन शेंडे, प्रा.सोनू घाटे , प्रा.रविना भूरसे, भावेश रेवतकर, माहेश्वरी पुण्यमरेड्डीवार यांनी अथक परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या संशोधनाला वाव मिळावा यासाठी संशोधन प्रयोगशाळा सुरू करण्याचा मानस कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here