
Birth anniversary celebrations of Kranti Jyoti Savitribai Phule and Jaipal Singh Munda at Potegaon

पोटेगावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व जयपालसिंग मुंडा यांच्या जयंती साजरी
गडचिरोली मौजा- पोटेगांव येथे आपल्या देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले आणि भारतीय संविधान सभेचे सदस्य जयपालसिंग मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली, जयपालसिंग यांचा जन्म 1903 मध्ये छोटा नागपूर येथे झाला, शिक्षण युरोपातील ओक्सफॉर्ड युनिवारसिटी येथे, भारतीय आदिवासी आणि झारखं आंदोलनातील सर्वोच्च नेता होते, सोबत पत्रकार, लेखक, संपादक, शिक्षणतज्ज्ञ आणि 1925 मध्ये ओक्सफॉर्ड ब्लू ‘किताब पाठकवणारे हॉकी चे एकमात्र अंतराराष्ट्रीय खेडाडू, जयपालसिंग मुंडा यांच्या नेतृत्वात आणि कप्तानी मध्ये भारताला 1928 मध्ये ऑलम्पिकचा प्रथम स्वर्ण पदक प्राप्त केले. या महामानवांना विनम्र अभिवादन करण्यात आला.या प्रसंगी पोटेगाव गावातील प्रथम नागरिक सरपंच मॅडम, तसेच गावातील नागरिक, महिला सामाजिक कार्यकर्त्या, परिसरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते यादी सहभागी होते..