A youth was killed in a collision with a truck transporting iron ore

141

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत युवक ठार

A youth was killed in a collision with a truck transporting iron ore

 गडचिरोली, Gadchieoli (maharastra) ता.17 : सुरजागड येथील पहाडावरून लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार युवक ठार झाल्याची घटना काल (ता. 16) रात्री 7 वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम गावाजवळ घडली. निकेश चोखारे (30) रा. लक्ष्मणपूर,ता.चामोर्शी असे मृताचे नाव आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीतून लोहखनिज उत्खनन करण्याचे काम लॉयड मेटल्स अॅड एनर्जी व त्रिवेणी अर्थमूव्हर्स या दोन कंपन्या संयुक्तपणे मागील दीड वर्षांपासून करीत आहेत. दररोज पहाडावरून लोहखनिज नेणारे शेकडो ट्रक सुरजागड-एटापल्ली – अहेरी – आष्टी मार्गे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दिशेने धावत असतात. यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी सुरजागड ट्रकच्या अपघातात लगाम गावाजवळ एक महिला ठार झाली होती. त्यावेळी नागरिकांनी 10 ट्रक पेटवून दिले होते. वारंवार घडणारे अपघात आणि खराब रस्ते यामुळे नागरिक संतापलेले असतानाच काल एका ट्रकने निकेश चोखारेचा बळी घेतला. निकेश हा लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीमध्येच चालक म्हणून कार्यरत होता. पत्नी गरोदर असल्याने तो रजा घेऊन गावी गेला होता. रजा संपल्याने तो काल कंपनीच्या मद्दीगुडम येथील कार्यालयात गेला. तेथे हजेरी लावून परताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यास जोरदार धडक दिली. यात तो घटनास्थळीच गतप्राण झाला. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. आज दुपारी निकेशच्या पार्थिवावर लक्ष्मणपूर या त्याच्या स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here