
प्रा. पूजा पानसे यांची राष्ट्रीय युवा महोत्सवात राज्य संघ व्यवस्थापक म्हणून निवड

Prof. Pooja Panse selected as State Team Manager in National Youth Festival
वरुन(रेल्वे) अमरावती दि 17 :- एम. एस. महाविद्यालयाच्या वरूड राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पूजा पानसे यांची हुबळी, जिल्हा धारवाड, कर्नाटक येथे आयोजित 26 व्या राष्ट्रीय युवा मोहत्सव 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य व गोवा राज्य येथून सहभागी होणाऱ्या विद्यापीठच्या चमुचे व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली आहे. दिनांक 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत या 26 व्या राष्ट्रीय युवा मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण देशभरातून विविध शासकीय विद्यापीठांच्या चमू या राष्ट्रीय युवा मोहत्स्वात सहभागी झाल्या आहेत. या राष्ट्रीय युवा मोहत्सवा मधून देशभरातील वैविध्यपूर्ण संस्कृतीची ओळख निर्माण केली जाते. देशाच्या कानाकोप ऱ्यातून या स्पर्धेत विद्यार्थी कलावंत सहभागी झाले आहेत.राष्ट्रीय युवा मोहत्सावाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते तर प्रमुख उपस्थिती कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोमाई व इतर केंद्रीय व राज्य मंत्री यांचे उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमात आयोजित विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त संघाने पारितोषिके पटकावली. यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचा विद्यार्थी श्री. अमर कतोरे याने शास्त्रीय गायन, कु. श्रेया शेळके हिने प्रश्नमंजुषा स्पर्धेत पारितोषिक पटकावले.
या राष्ट्रीय युवा महत्सवात यशस्वी सहबाग व यशाबद्दल डॉ. दिलीप मालखेडे कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, श्री डॉ. कार्तिकेयन, महाराष्ट्र व गोवा राज्य केंद्र संचालक तसेच डॉ. राजेश बुरांगे यांनी प्रा. पूजा पानसे व सहभागी विद्यार्थी संघाचे अभिनंदन केले.