लॉयड्सच्या खेळाडूंची दमदार कामगिरी; राज्य व जिल्हास्तरावर पदकांची लयलूट

61

लॉयड्सच्या खेळाडूंची दमदार कामगिरी; राज्य व जिल्हास्तरावर पदकांची लयलूट

विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर/गडचिरोली — लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी आणि लॉयड्स राज विद्या निकेतन (एलआरव्हीएन) शाळेच्या खेळाडूंनी अलीकडे झालेल्या राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत पदकांची लयलूट केली आहे. ब्रह्मपुरी स्पोर्ट्स फेस्टिव्हल 2026 अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा तसेच गडचिरोली येथील जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेत त्यांच्या चमकदार कामगिरीची नोंद झाली.
चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत अंडर-18 मुलींच्या गटात मोनिका मडावी हिने लांब उडीमध्ये सुवर्णपदक आणि 100 मीटर धावण्यात रौप्यपदक जिंकत दुहेरी यश संपादन केले. अंडर-14 गटात भाग्यश्री मुलमा हिने गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक तर 100 मीटर धावण्यात कांस्यपदक मिळवून बहुगुणी कामगिरी साकारली.
दरम्यान, गडचिरोली येथील पायलट प्रोजेक्ट आर्चरी सेंटरमध्ये पार पडलेल्या अंडर-15, अंडर-13 आणि अंडर-10 जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेतही लॉयड्सच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवला. विशेष म्हणजे शालेय गटातील सर्व पदक विजेते एलआरव्हीएन शाळेचेच ठरले.
अंडर-15 मुलींच्या गटात पल्लवी सुरेश गोडसेलवार हिने सुवर्णपदक, तर पूर्वी विकास देबनाथ हिने रौप्यपदक जिंकले. अंडर-15 मुलांच्या गटात सागर सुब्रत सरकार याने सुवर्णपदक पटकावले. अंडर-13 गटात उज्ज्वल दिनेश दास याने कांस्यपदक, तर अंडर-10 गटात अनिश बुधन सिंकू याने रौप्यपदक मिळवले. तसेच सौरभ राऊत याने अंडर-15 मुलांच्या डिस्टन्स व इंडिव्हिज्युअल प्रकारात कांस्यपदक जिंकले, तर गौरी गावतुरे हिने अंडर-15 मुलींच्या गटात डिस्टन्स प्रकारात द्वितीय आणि इंडिव्हिज्युअल प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला.
संरचित प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन, आधुनिक सुविधा आणि शिस्तबद्ध वातावरण या मजबूत क्रीडा पायाभूत व्यवस्थेमुळे लॉयड्सचे खेळाडू सातत्याने यश संपादन करत आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील प्रतिभेला संधी देण्याच्या उद्देशाने संस्थेकडून क्रीडा विकासासाठी सातत्याने गुंतवणूक केली जात असून त्याचे सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here