ऊद्यापासुन ११ फरवरी पासुन  गडचिरोलीत पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या  चालक पोलीस

166

ऊद्यापासुन ११ फरवरी पासुन  गडचिरोलीत पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या

चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई पदांसाठी 27,087 उमेदवार अर्जदार

गडचिरोली दि १० फरवरी :-  जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या पोलीस भरती 2024-2025 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2026) अंतर्गत चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई पदांसाठीच्या मैदानी (शारीरिक) चाचण्या येत्या 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहेत. या चाचण्या गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर 11 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीत पार पडणार आहेत.
चालक पोलीस शिपाईच्या 27 जागांसाठी 3,296 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यात 2,797 पुरुष व 499 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर पोलीस शिपाईच्या 717 जागांसाठी तब्बल 23,791 उमेदवारांनी अर्ज सादर केले असून त्यात 16,310 पुरुष व 7,481 महिला उमेदवार आहेत. दोन्ही पदांसाठी मिळून एकूण 27,087 अर्ज प्राप्त झाले आहेत.
चालक पोलीस शिपाई पदाची भरती 11 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडणार असून पोलीस शिपाई पदासाठीची भरती 14 फेब्रुवारी ते 7 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. पहिल्या दिवशी सुमारे 1,300 उमेदवारांची, तर त्यानंतर दररोज सरासरी 1,500 उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.
भरती प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 69 अधिकारी व 482 पोलीस अंमलदार असे एकूण 551 मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. सर्व उमेदवारांकडे गडचिरोली जिल्ह्याचे वैध रहिवासी प्रमाणपत्र असणे अनिवार्य असून, सर्व प्रमाणपत्रे 7 डिसेंबर 2025 पूर्वीची असणे बंधनकारक आहे.
मैदानी चाचण्यांसाठी प्रवेशपत्रे महाआयटी विभागामार्फत ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी ती
👉 https://policerecruitment2024.mahait.org�
या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रवेशपत्रावर नमूद तारखेला आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे.
ही भरती प्रक्रिया अत्याधुनिक व पारदर्शक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राबविण्यात येणार आहे. उमेदवारांची उंची व छाती मोजणीसाठी डिजिटल PST, धावण्याच्या चाचण्यांसाठी RFID आधारित प्रणाली, तर गोळाफेक चाचणीसाठी Prism Technology वापरण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी केली जाणार आहे.
पावसामुळे किंवा एकाच दिवशी एकापेक्षा अधिक ठिकाणी चाचणी असल्यास उमेदवारांना पर्यायी तारीख देण्यात येईल. भरती प्रक्रियेत कोणताही गैरमार्ग वापरल्यास उमेदवारी रद्द करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
कोणताही आमिष किंवा फसवणूक होत असल्यास उमेदवारांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष (दूरध्वनी क्र. 8806312100) किंवा जवळच्या पोलीस कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here