गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या संयोजकपदी उदय धकाते व तिलोत्तमा समर हाजरा यांची निवड

347

गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या संयोजकपदी उदय धकाते व तिलोत्तमा समर हाजरा यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली, दि. ४ :
गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. जिल्ह्यातील विविध वृत्तसंस्था व न्यूज पोर्टलच्या संपादकांचा समावेश असलेली ही कार्यकारिणी पत्रकार संघटनेला अधिक सक्षम व प्रभावी बनवणारी ठरणार आहे.
या निवड प्रक्रियेत महाभारत न्यूज पोर्टलचे संपादक उदय धकाते यांची संयोजकपदी फेरनिवड करण्यात आली असून, ग्लोबल गडचिरोली न्यूजच्या मुख्य संपादिका तिलोत्तमा समर हाजरा यांची संयोजकपदी नव्याने निवड करण्यात आली आहे.
विविध वृत्तसंस्था तसेच सोशल मीडियावरील न्यूज पोर्टलच्या संपादकांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला असून, पत्रकार संघटनेच्या बळकटीसाठी ही निवड महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
नव्या कार्यकारिणीतील सदस्य पुढीलप्रमाणे —
गडचिरोली वार्ता – संपादक जयंत निमगडे
एव्हीबी न्यूज – संपादक अनिल बोदलकर
गोडवाना न्यूज – संपादक व्यंकटेश डुडमवार
एस भारत न्यूज – संपादक प्रा. श्रीमंत सुरपाम
लोकवृत्त – निलेश सातपुते
के विदर्भ न्यूज – सुरज हजारे
लोक प्रवाह – किशोर खेवले
न्यू प्राणहिता न्यूज – कृष्णा वाघाडे
विदर्भ क्रांती न्यूज – मुक्तेश्वर मशाखेत्री
गडविश्व – हिताश्री जिवतोडे
वृत्तवाणी – प्रविण चन्नावार
नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न, हक्क, स्वातंत्र्य व सुरक्षितता यासाठी संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पत्रकारांमध्ये समन्वय, एकजूट आणि व्यावसायिक मूल्यांची जपणूक करत लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम करण्याचा संकल्प नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या नव्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here