नवीन वर्षाच्या निमित्ताने जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार : नगरसेविका योगिता पिपरे

66

नवीन वर्षाच्या निमित्ताने जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार : नगरसेविका योगिता पिपरे

गडचिरोली | प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांसह गडचिरोली शहरातील सर्व नागरिकांना नगरसेविका योगिता पिपरे यांनी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना नगरसेविका योगिता पिपरे म्हणाल्या,
“प्रभागातील व शहरातील माझ्या प्रिय जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी ना स्वार्थासाठी, ना सत्तेसाठी लढा दिला आहे. माझा लढा आणि माझे कार्य फक्त जनतेच्या विकासासाठी आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. येणाऱ्या काळात फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठीच कार्य केले जाईल.”
प्रभाग क्रमांक ३ च्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेविका योगिता पिपरे, माजी नगरपरिषद अध्यक्ष तसेच भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
नवीन वर्षाच्या प्रारंभीच सेवा, पारदर्शकता आणि विकासाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, प्रभागाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here