चामोर्शी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा ऊपविभागीय अधिकारीयांना निवेदन

113

चामोर्शी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा ऊपविभागीय अधिकारीयांना निवेदन

गडचिरोली ता. ४ नोव्हेंबर : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या मेहनतीने पिकवलेली धान, तूर, भात यासारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर “ओला दुष्काळ” घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.

या संदर्भात निवेदन कर्त्यानी शासनाला इशारा दिला आहे की,“सरकारने तात्काळ सरसकट आर्थिक मदत जाहीर करून ओला दुष्काळ घोषित केला नाही, तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर बनेल. आज शेतकऱ्यांच्या तोंडात घास नाही. सरकारने शेतकऱ्यांकडे तत्काळ लक्ष दिले नाही, तर आम्ही मोठे आंदोलन उभारू,”

असे स्पष्ट शब्दात सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांना आवाज दिला.

शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. सततच्या पावसामुळे शेतातील पिके नष्ट झाली, जनावरांसाठी चारा नाही, आणि बाजारातील दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर राहुल वैरागडे, विलास चिचघरे, हेमंत कोवासे, डॉ. रवींद्र सुरपाम, वसंत राऊत, निखिल धावरे, यशवंत साखरे, अजय नैताम, रितिक पिपरे, पंढरीनाथ सातपुते आणि राकेश खोबे यांनी प्रशासनासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली. त्यांनी प्रशासनास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की — “आपण सगळ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. शासन दरबारी आम्ही स्वत: आवाज उठवून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देऊ.”

दरम्यान, मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, बाजारातील घसरलेले दर आणि अपूर्ण सरकारी मदत यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिकच संकटात सापडले आहे. या वर्षी मात्र अतिवृष्टीने परिस्थिती भीषण बनली आहे.

या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री यांना उद्देशून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे निवेदन देऊन चामोर्शी तालुक्यास “ओला दुष्काळग्रस्त” घोषित करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनामुळे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here