जि.प. व प.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विधानसभा क्षेत्रात दौरा करणार – माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी

128

जि.प. व प.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विधानसभा क्षेत्रात दौरा करणार – माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी

14 ऑक्टोबरला वडधा परिसरातून होणार सुरुवात

प्रतिनिधी

आरमोरी (दि. ५ ऑक्टोबर) – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तर्फे संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रात संघटन मजबूत करण्यासाठी आणि उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी १४ ऑक्टोबरपासून विशेष दौऱ्याला प्रारंभ होणार असल्याची माहिती पक्षाचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी दिली.डॉ. मडावी हे ५ ऑक्टोबर रोजी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी सांगितले की, “जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षाची सशक्त बांधणी आणि संभाव्य उमेदवारांची पडताळणी करण्याच्या उद्देशाने हा दौरा घेतला जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात आरमोरी तालुक्यातील वडधा क्षेत्रातून १४ ऑक्टोबर रोजी होईल.

या दिवशी देलोडा, वडधा, विहीरगाव, कोरेगाव, पिसेवडधा आणि जाभळी या गावांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीचे संभाव्य उमेदवार, तसेच पक्षाचे स्थानिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत.या दौऱ्यादरम्यान वरिष्ठ नेते उपस्थित राहणार नसून, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, महिला आघाडीच्या अध्यक्षा आणि तालुका पातळीवरील प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.डॉ. मडावी म्हणाले, “हा दौरा धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार व धर्मराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणूक लढवणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हीच प्रमुख शक्ती ठरणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच १३ ऑक्टोबरला जि.प. व प.स. सदस्यांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर तात्काळ १४ ऑक्टोबरपासून दौऱ्याला प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात युतीचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

या पत्रकार परिषदेला जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या कल्पना तिजारे, आरमोरी विधानसभा सहअध्यक्ष सुनील नंदनवार, तालुकाध्यक्ष अमीन लालानी, शहराध्यक्ष प्रदीप हजारे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष वृशाली भोयर, रामदास दहीकर, सुनील बांगरे, श्रीमती बागडे मॅडम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here