संभाजीनगरच्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत गडचिरोली च्या महिला दाखविणार कर्तृत्वमा;.खा. डॉ. श्री. अशोकजी नेते यांचा पुढाकार व प्रेरणादायी पाठबळ_
गडचिरोली (दि. २७ ऑगस्ट २०२५)
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व बृहन महाराष्ट्र योग परिषद संलग्नित गडचिरोली जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे नुकत्याच जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत १० ते ५५ वयोगटातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. ट्रेडीशनल, फारवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, ट्वीस्टिंग, हॅण्डबॅलन्स, लेग बॅलन्स, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर व सुपाइन या १० प्रकारांत खेळाडूंनी आपले कौशल्य सादर केले.
यंदा गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एकूण १२ महिला व पुरुष खेळाडू संभाजीनगर येथे होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचा पुढाकार!
लोकसभा क्षेत्राचे व जिल्ह्याचे लाडके माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी गडचिरोली येथील आपल्या निवासी कार्यालयात सर्व महिला खेळाडूंना आशीर्वाद व अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्यता निधी देऊन खेळाडूंचे मनोबल उंचावले. त्यांच्या या पुढाकारामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण ५५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये सुवर्णपदक विजेत्या महिला व पुरुष खेळाडूंपैकी निवडक १२ खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत –
वयोगट २८ ते ३५ वर्षे : सौ. स्नेहा रत्नाकर वाणी (ट्रेडीशनल, लेग बॅलन्स), सौ. शीतल व्यंकटरमण येल्लेवार (ट्वीस्टिंग), सौ. अश्विनी नत्थूजी ढेगळे (फॉरवर्ड बेंडिंग), सौ. दैशाली सोमेश धुडसे (सुपाईन), श्री. विशाल माधवराव भांडेकर (ट्रेडीशनल, लेग बॅलन्स).
वयोगट ३५ ते ४५ वर्षे : सौ. रमा अरविंद भैसारे (सुपाईन), सौ. चंदा दिलीप ठेरा (ट्रेडीशनल, बॅकवर्ड बेंडिंग), सौ. सुप्रिया रिलेश निखाडे (ट्वीस्टिंग), सौ. दीपिका विजय बोन्देलवार (लेग बॅलन्स).
वयोगट ४५ ते ५५ वर्षे : सौ. वसुधा विनोद बोबटे (ट्रेडीशनल, बॅकवर्ड बेंडिंग), सौ. वर्षा प्रवीण मोडक (लेग बॅलन्स), श्री. धनराज धोन्डूजी कांबळे (ट्रेडीशनल).
हे सर्व खेळाडू एन.आय.एस. योग प्रशिक्षक डॉ. अनिल एन. निकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. आपल्या यशाचे श्रेय खेळाडूंनी मा.खा. डॉ. अशोकजी नेते, प्रशिक्षक, पालक व कुटुंबीय तसेच मित्र परिवाराला दिले आहे.
या खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीबद्दल गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वच स्तरांतून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी योगाचे निकोडे सर यांच्यासह अनेक योग प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.













