29 ऑगष्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त भव्य क्रीडा रॅलीचे आयोजन

88

29 ऑगष्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त भव्य क्रीडा रॅलीचे आयोजन

 

गडचिरोली, दि. 26 ऑगस्ट (nm news agency ): महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व खेळाडूंमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी स्व. मे. ध्यानचंद, हॉकीचे जादूगार यांचे जन्मदिनानिमीत्य राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन क्रीडामय वातावरणात करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 29 ऑगष्ट, 2025 रोजी सकाळी ९.०० वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे भव्य क्रीडा रॅलीचे आयोजन करणायत आले आहे. तसेच राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धां रस्सा खेच, ५० मीटर रीले, चमचा गोळी, पोता दौड, योगा, खो-खो, कबड्डी व व्हॉलीबॉल इत्यादी खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील खेळाडू/संघांनी आपला प्रवेश दि. 28 ऑगस्ट 2025 पर्यंत नोंदवावा. तसेच या दिवशी जिल्हास्तरावर व विविध संस्थामध्ये विविध क्रीडा विषयक उपक्रम, गतवर्षीच्या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार इत्यादि क्रीडा उपक्रम राबवून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येत आहे. अधिक माहिती करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे संपर्क साधावा व विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी https://fitindia.gov.in/national-sports-day-2025 या लिंकवर नोंदणी करावी व जास्तीत जास्त संख्येने खेळाडूंनी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केलेले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here