१ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

133

१ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

 

गडचिरोली, दि. २६ ( nm news agency gadchiroli) – जिल्हास्तरावरील लोकशाही दिन दिनांक १ सप्टेंबर २०२५ (सोमवार) रोजी दुपारी ३.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

तक्रार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

ज्या तक्रारदारांना जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात आपला अर्ज सादर करायचा आहे, त्यांनी खालील बाबींचे पालन करणे आवश्यक आहे:

तक्रारदाराने आपली समस्या प्रथम तालुका स्तरावरील लोकशाही दिनात सादर करणे अपेक्षित आहे.

जर त्या स्तरावरील तहसिलदारांकडून प्राप्त उत्तरावर समाधान झाले नाही, तर त्या उत्तराची प्रत तसेच तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

अर्ज प्रपत्र-१(ब) या विहित नमुन्यात भरून, अर्जाची एक आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

तक्रार/निवेदन हे केवळ वैयक्तिक स्वरुपाचे असावे. सामूहिक किंवा सर्वसाधारण स्वरुपाच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here