गडचिरोली जिल्ह्यात नियमित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याची नेमणूक करावी? -राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली

89

गडचिरोली जिल्ह्यात नियमित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याची नेमणूक करावी? -राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली,

 

गडचिरोली दिनांक 7 ऑगस्ट  :- गडचिरोली जिल्ह्यात खेळाच्या बाबतीत येथील आदिवासी बहुल भागातील अनेक युवक युवती खूप मोठ्या लेवलचे खेळाडू आहेत परंतु गेल्या एक वर्षापासून या आधीचे क्रीडा अधिकारी निवृत्त झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात प्रभारी जिल्हा अधिकारी क्रीडा अधिकारी यांच्यावर संपूर्ण जिल्हा क्रीडाचे काम सोपवलेले आहे गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्रीडांगणाचे खूप मोठे विकासाचे काम सुरू आहे परंतु या ठिकाणी आजपर्यंत नियमित जिल्हा क्रीडा अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली नाही गडचिरोली जिल्ह्यात येथील खेळांना प्रोत्साहित करण्यासाठी व मोठ्या लेवल वरील खेळाडू तयार होण्यासाठी प्रभारी क्रीडा अधिकारी यांच्यावर सोपवलेले जबाबदारीने जिल्ह्यातील क्रीडा कार्य खरोखरच यशस्वी होईल का ? व गडचिरोली जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल काय ?हा प्रश्न निर्माण झाला आहे?गडचिरोली जिल्ह्यातील विविध क्रीडा खेळांना प्रोत्साहित करण्यासाठी व या ठिकाणी मोठ्या लेव्हलवर क्रीडा स्पर्धा होण्यासाठी निश्चितच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याची नितांत गरज आहे? परंतु राज्य सरकारच्या व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षितपणामुळे आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात नियमित जिल्हा क्रीडा अधिकारी यांची नेमणूक झालेली नाही तरी गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व राज्य सरकारला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने अशी मागणी करण्यात येत आहे की निदान राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात तरी नियमित जिल्हा क्रीडा अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली यांनी केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here