भाजपच्या जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्य वृक्षारोपण व अन्नदान कार्यक्रम
गडचिरोली: दिनांक १७ जुलै :- (Gadchiroli)भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्य गडचिरोली शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. शहरातील पंचवटी नगर व सोनापूर कॉम्प्लेक्स वॉर्डात एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राबवून योगीताताई पिपरे व प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच महिला रुग्णालयात माणुसकीचा घास कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित मान्यवरांचा हस्ते रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करण्यात आले. यानंतर शासकीय विश्रामगृहात अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.*
*याप्रसंगी प्रामुख्याने माजी खासदार डॉ अशोक नेते, आम. डॉ मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा रमेशजी बारसागडे, माजी आमदार डॉ देवरावजी होळी माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, डॉ नितीन कोडवते, लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे , जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस, जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, चंदाताई कोडवते, माजी शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, विवेक बैस, प्रा. अरूण उराडे, देवाजी लाटकर, माजी नगरसेविका लता लाटकर, वैष्णवी नैताम, अलकाताई पोहनकर,वर्षाताई कन्नाके, निताताई बैस, कोमल बारसागडे, अर्चना चन्नावार, गीता कुळमेथे, संघमित्रा खोब्रागडे, पूनम हेमके, दर्शिता प्रमोद पिपरे तथा भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*













