पिडीत मुलीवर बलात्कार करुन गर्भपात करणा-या आरोपीतांना सात वर्ष सश्रम कारावास व ५,०००/- रुपये द्रव्यदंडाची शिक्षा

60

पिडीत मुलीवर बलात्कार करुन गर्भपात करणा-या आरोपीतांना सात वर्ष सश्रम कारावास व ५,०००/- रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहेरी श्री. आर.एन, बावणकर यांचा न्यायनिर्णय

गडचिरोली:- आरोपी नागे अनिल नानाजी ईजगामकर, वय ३४ वर्ष, जात कुणबी, रा. आलापल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली यांनी पिडीत (रा. नागेपल्ली जात- माडीया) मुलीशी तिन वर्षापासून प्रेमसंबंध जुळवुन लग्न करतो असे आमिष दाखवुन वेळोवेळी शारीरीक संबध केल्याने ती गर्भवती राहिल्याने तिचे गर्भपात करण्याकरीता यातील आरोपी याने मावशी नागे चंद्रकला सुरेश धानोरकर, वरा ४७ वर्ष रा. अनखोडा ता. चामोर्शी हिचे मदतीने पिडीतेला औषध पाजून गर्भपात केला. त्यामुळे पिडीतेला रक्तस्त्राव होवुन गंभिर आजारी झाली. यातील पिडीता हि अल्पवयीन व अनुसुचीत जाती जमातीची असल्याचे आरोपीस माहित असतांनाही तो तिवेसोबत वारंवार शारीरीक संबध प्रस्तापीत केला. अशा फिर्यादवरुन पोस्टे अहेरी अप.क. १३३/२०१७ कलम ३७६,३१७,३४ भादवी, ४,६,८ पोक्सो तसेच ३(१) (डब्लू) (11) अ.जा.ज.वा. अन्टारो गुन्हा नोदं केले. तपासादरम्यान सदर गुन्हयातील पिडीता हि उपचारादरम्यान मरण पावल्याने कलम ३०२ भादवी वाढ करण्यात आले, तपासात आरोपी विरुध्द मृत्यू पुर्व जबानी (बयाण) दिल्यामुळे तसेच सबळ पुरावा मिळून आल्याने दोषारोपपत्र तयार करुन सेशन कोर्टात दाखल केले,

 

मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, अहेरी याने स्पेशल केस क्र. २७/२०२३ मध्ये साक्ष पुरावा घेतले असता फिर्यादी व साक्षीदार तसेच वैदयकीय अभिप्राय यांचे पुरावा व सरकारी पक्षाचे युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरुन दिनांक ०३/१२/२०२४ रोजी आरोपी क. १ अनिल नानाजी ईजगागकर याला कलम ३१५ भादवी मध्ये ७ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- रुपये दंड तसेच आरोपी क. २ चंद्रकला सुरेश धानोरकर यांना कलम ३१५ भादवी मध्ये ४ वर्ष कारावास व ५०००/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावली,

सरकार पक्षातर्फे सहा, सरकारी वकील श्री. निळकंठ भांडेकर यांनी कामकाज पाहीले तसेच गुन्हयाचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी, अहेरी श्री. गजानन बाळासाहेब टोम्ये यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षादारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व अंगलदार यांनी कामकाज पाहीले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here