डॉ. मिलिंद नरोटे: नवे नेतृत्व,नवे संकल्प करुया सशक्त गडचिरोली घडवुया दिवाकर गेडाम

9

डॉ. मिलिंद नरोटे: नवे नेतृत्व,नवे संकल्प करुया सशक्त गडचिरोली घडवुया

आता गडचिरोलीच्या विकासासाठी एकत्र येऊया! 20 नोव्हेंबरला डॉ. मिलिंद नरोटे यांना आपले मत देऊन, गडचिरोली मतदारसंघासाठी उज्ज्वल भविष्याची नवी सुरुवात करूया.

भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार, डॉ. मिलिंद नरोटे हे आपल्या गडचिरोलीसाठी कटिबद्ध, निष्ठावंत आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व आहेत. एक डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करत असताना त्यांनी गडचिरोलीतील जनतेच्या अडचणी जवळून अनुभवल्या आहेत, आणि आता ते विधानसभेत आपल्या प्रश्नांना ठोस आवाज देण्यासाठी तयार आहेत. त्यांचे नेतृत्व विकास, शिक्षण, आणि आरोग्य क्षेत्रात प्रगती घडवून आणण्यासाठी मजबूत आश्वासन देते. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणारे आणि गडचिरोलीसाठी एक नवा मार्ग निर्माण करण्याचे ध्येय असलेले डॉ. मिलिंद नरोटे आपल्या विश्वासास पात्र ठरतील.

डॉ. मिलिंद नरोटे यांनाच का निवडावे?

१. सर्वसामान्यांच्या सेवेत निष्ठावान नेता: डॉक्टर म्हणून जनतेची सेवा करताना, त्यांनी गडचिरोलीतील समस्या प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत. गरिबांच्या आरोग्य आणि त्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून, त्यांनी नेहमीच जनतेच्या हितासाठी कार्य केले आहे. सत्ता हा फक्त एक माध्यम मानून, त्यांनी सेवा हेच ध्येय म्हणून काम केले आहे. अशा नेतृत्वाला विधानसभेत पाठवून आपण गडचिरोलीला सक्षम नेतृत्व देऊ शकतो.

२. आरोग्य क्षेत्रातील गहन अनुभव: डॉ. मिलिंद नरोटे यांनी आपल्या वैद्यकीय सेवेमुळे गडचिरोलीतील आरोग्य समस्या जवळून पाहिल्या आहेत. गावागावांतील आरोग्य सुविधांच्या अभावाची त्यांना जाणीव आहे, आणि विधानसभेत निवडून गेल्यावर, ते गडचिरोलीच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी अधिक ठोस उपाय योजतील. त्यांचे ध्येय आहे की, गडचिरोलीतील प्रत्येकाला चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात.

३. शिक्षणात सुधारणा आणि रोजगार निर्मिती: गडचिरोलीतील युवकांना दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी डॉ. नरोटे कटिबद्ध आहेत. गडचिरोलीतील शैक्षणिक दर्जा वाढविणे आणि युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देणे, हा त्यांचा संकल्प आहे. विधानसभेत निवडून गेल्यावर, ते शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम राबवतील, ज्यामुळे गडचिरोलीतील युवकांना आत्मनिर्भरता प्राप्त होईल.

४. प्रामाणिक आणि कटीबद्ध नेतृत्व: डॉ. मिलिंद नरोटे हे एक सज्जन, प्रामाणिक आणि सेवाभावी नेते आहेत. त्यांच्या कर्तव्यशीलतेमुळे त्यांनी समाजात विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. गडचिरोलीच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा, आणि समस्यांचा योग्य तोडगा निघावा, यासाठी ते सतत कार्यरत राहतील. त्यांच्या सेवाभावामुळे ते समाजाच्या मनात विशेष स्थान मिळवतात.

विरोधकांचे आव्हान आणि जनतेचा विश्वास

डॉ. मिलिंद नरोटे यांचे विरोधक गडचिरोलीमध्ये गेल्या काही वर्षांत जि.प.मध्ये निवडून येऊन उपाध्यक्ष म्हणून राहिलेले बलाढ्य नेते आहेत, परंतु त्यांनी गडचिरोलीच्या विकासात अपेक्षित योगदान दिले नाही. विकासाच्या मागे राहिलेल्या गडचिरोलीला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी आता डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासारख्या निष्ठावंत नेतृत्वाला संधी देण्याची वेळ आली आहे. त्यांचे नेतृत्व गडचिरोलीच्या विकासाला नवा दृष्टिकोन देईल आणि प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेईल.

आपले मत, गडचिरोलीचा विकास

20 नोव्हेंबर रोजी, आपल्या गडचिरोलीच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने एक निर्णायक दिवस आहे. आपला एक मत हा गडचिरोलीच्या विकासाच्या दिशेने एक पाऊल ठरू शकतो. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या नव्या संधींसाठी आपले मत एक सशक्त निर्णय ठरेल. हे केवळ मतदान नव्हे, तर आपल्या भागाच्या प्रगतीचे वचन आहे.

गडचिरोलीसाठी नवा अध्याय सुरू करूया

डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीला नवा अध्याय मिळेल, जो विकास, सशक्तीकरण आणि सेवा या तत्त्वांवर आधारित असेल. त्यांचे नेतृत्व प्रत्येकाच्या समस्या जाणून घेणारे, तसेच त्या समस्यांचे समाधान शोधणारे असे आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे गडचिरोलीसाठी एक नवा विकासमार्ग निर्माण होईल, आणि समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल, हीच अपेक्षा आहे.

चला, या निवडणुकीत आपल्या गडचिरोलीच्या प्रगतीसाठी एक ठोस निर्णय घेऊया. आपल्या हक्कांसाठी, आपल्या विकासासाठी आणि सशक्त गडचिरोलीच्या उभारणीसाठी, 20 नोव्हेंबरला आपले मत देऊन डॉ. मिलिंद नरोटे यांना विधानसभेत पाठवूया!

डॉ. मिलिंद नरोटे: नवा चेहरा, नवी शक्ती – विकासासाठी आपल्या मताची साथ द्या!

लेखन साहीत्य दिवाकर  रामदास गेडाम

ग्रामपंचायत सदस्य व्याहाड बुज ता.सावली जि.चंद्रपूर तथा मा.खा.अशोक जी नेते साहेब यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here