मार्कंडादेव markanda deo ta.chamorshi dist gadchiroli वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने तहसील कार्यालयासमोरील वळणावर दुचाकीला चिरडले. यात दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना २५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. मृतांत आई- मुलासह चुलत सासूचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघांची प्राणज्योत मावळली झाल्याने मार्कंडा देव गाव शोकग्रस्त आहे.प्रियंका गणेश जनध्यालवार (२४), रुद्र गणेश जनध्यालवार (५) व भावना नरेंद्र जनध्यालवार (४५) अशी मृतांची नावे आहेत. तर नरेंद्र नरेश जनध्यालवार (५२) हे जखमी असल्याचे माहीती असुन त्यांना जिला सामान्य रुग्णालय गडचिरोलीला केले गेले आहे.मार्कंडादेव (markanda deo Ta.chamorshi) येथील हे कुटुंब कामानिमित्त तहसील कार्यालयात आले होते. काम आटोपून दुपारी ४ वाजता दुचाकीवरुन (एमएच ३३ के-३१३५) गावी जाण्यासाठी निघाले. याचवेळी सुरजागड येथून लोहखनिज घेऊन ट्रक (सीजी ०८एयू- ९०४५) येत होता. या ट्रकने तहसील कार्यालयासमोर दुचाकीला चिरडले. दुचाकी समोरील चाकाखाली सापडल्या नंतर १० ते १५ फूट फरफटत गेली. यात रुद्र व भावना यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियंका यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. नरेंद्र जनध्यालवार यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.
Latest article
एडव्होकेट विश्वजित कोवासे उत्तम जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वसामान्य लोकांत येतील — विजय वडेट्टीवार यांचा विश्वास
एडव्होकेट विश्वजित कोवासे उत्तम जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वसामान्य लोकांत येतील — विजय वडेट्टीवार यांचा विश्वास
गडचिरोली : जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात उत्साहाची नवी ऊर्जा निर्माण...
शुभेच्छा बातमी शेतकरी मेळावा, दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
शुभेच्छा बातमी
शेतकरी मेळावा, दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या पदग्रहण सत्कार सोहळ्याचे...
‘डफरे बजाओ’ आंदोलनातून अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या हकालपट्टीची मागणी; अरविंदभाऊ कात्रटवार आक्रमक निकृष्ट पुल...
‘डफरे बजाओ’ आंदोलनातून अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या हकालपट्टीची मागणी; अरविंदभाऊ कात्रटवार आक्रमक
निकृष्ट पुल बांधकाम, बोगस कामे व भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून शासनाला धारेवर
गडचिरोली, दि. २५ मे...











