प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन २०२२-२३

67

प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन २०२२-२३

 

गडचिरोली,(Gadchiroli दि.22 : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना खरीप हंगाम २०२० पासुन तीन वर्षा करीता राबविण्याची मान्यता देण्यात आली होती तथापी केंद्र शासनाच्या सुचने नुसार यंदा एका वर्षाकरीता Cup & Cap model (80:110) नुसार राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

योजनेची उददीष्टये यात नैसर्गिक आपत्ती किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पूरवठयात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषिक्षेत्राच्या गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.

 

योजनेची वैशिष्टये कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजना फक्त अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी लागू आहे. कुळाने किंवा भाडेपटटीने शेती करणारे शेतकरी पात्र आहेत. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

 

जोखमीच्या बाबी – पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Mid Season Adversity) पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपिट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट ,स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Localized Calamities) नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान (Post Harvest Losses) प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन 2022-23 मध्ये गडचिरोली जिल्हयामध्ये भारतिय कृषि विमा कंपनी कंपनीकडून राबविण्यात येईल. योजनेअंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम तपशील पुढिलप्रमाणे असून, विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे. तथापि, रब्बी हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांना भरावयाचा प्रति हेक्टरी विमा हप्ता दर 1.5 टक्के तसेच रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला असून खालीलप्रमाणे आहे.

विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पिकाचे नाव, अधिसुचित महसुल मंडळ, विमा संरक्षित रक्कम प्रती हे. (रुपये), शेतकऱ्यांने सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर (रुपये) पुढील प्रमाणे:- गहू बागायत:- कुरखेडा, कढोली, पुराडा, मालेवाडा (तालुकाकुरखेडा)विमा संरक्षित रक्कम प्रती हे. 27500/- , भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर 412.50 रु. ज्वारी जिरायत:- गडचिरोली, पोर्ला, ब्राम्हणी, येवली, पोटेगाव (तालुकागडचिरोली) आरमोरी, देऊळगाव, वैरागड, पिसेवडधा (तालुकाआरमोरी) चामोर्शी, कुनघाडारै, भेंडाळा, घोट, येनापूर, आष्टी (तालुकाचामोर्शी) मुलचेरा, लगाममाल (तालुकामुलचेरा) सिरोंचा,ब्राम्हणी, पेंटीपाका, असरअल्ली (तालुकासिरोंचा) अहेरी, आलापल्ली, खमनचेरु,जिमलगटटा,पेरमीली,कमलापूर (तालुकाअहेरी) विमा संरक्षित रक्कम प्रती हे. 22500/- ,भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर 337.50 रु. , हरभरा:- कुरखेडा, कढोली, मालेवाडा, पुराडा (कुरखेडातालुका) वडेगाव, कोटगुल कोरची, म्हसेली (कोरचीतालुका) आरमोरी, देऊळगाव, वैरागड, पिसेवडधा (आरमोरी तालुका)विमा संरक्षित रक्कम प्रती हे.20000/- भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर 300 रु. , उन्हाळी भात, कुरखेडा तालुका सर्व महसूल मंडळ , आरमोरी तालुका सर्व महसूल मंडळ , सिरोंचा तालुका सर्व महसूल मंडळ वडसा तालुका सर्व महसूल मंडळ,विमा संरक्षित रक्कम प्रती हे.37500/-, भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर 562.50 रु. सर्व शेतकऱ्यांनी दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पूर्वी रब्बी ज्वारी, १५ डिसेंबर पुर्वी गहू बागायत, हरभरा व ३१ मार्च २०२२ पूर्वी उन्हाळी भात पिकासाठी पिक विमा भरुन योजनेत सहभाग घ्यावा अधिक माहितीसाठी नजीकचे तालुका कृषि अधिकारी / उपविभागीय कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here