पोस्को गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यात गडचिरोली पोलीसांना मिळाले यश

120

पोस्को गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यात गडचिरोली पोलीसांना मिळाले यश

 

Karpanfundi( Ettapali -Gadchiroli) – झाले असे कि दि. ०३/११/२०२२ रोजी पोस्टे एटापल्ली येथील अप.क्र. ०४० / २०२२ कलम ३७६ (२) (जे), ३७६ (एबी), भादंवि, सहकलम ४, ६ पोस्को अँक्ट गुन्ह्यातील फरार आरोपी नामे सुंदरसाई घिस्सो मडावी, वय २५ वर्षे, रा. करपनफुंडी ता. एटापल्ली हा ०२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गेल्या ०३ महिन्यांपासून फरार झाला होता. सदर फरार आरोपी हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असलेल्या येलचिल, बुर्गी, ताडगाव अशा वेगवेगळ्या जंगल परिसरामध्ये लपुन बसला असल्यामुळे व हा परिसर नक्षलदृष्ट्या अतिप्रभावीत असल्यामुळे त्याचा शोध घेण्यास पोलीसांना खुप अडचणींचा सामना करावा लागला होता.

दिनांक ०३/११/२०२२ रोजी पोलीसांनी गोपनिय यंत्रणा सक्रीय करून व गुप्त माहितीच्या आधारे अभियान राबवुन आरोपी सुंदरसाई मडावी यास मौजा करपनफुंडी गावात पकडून अटक करून मा. जिल्हा सत्र व विशेष न्यायालय, गडचिरोली येथे पोलीस कस्टडी रिमांड घेण्याकरिता हजर करण्यात आले. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल  व मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी श्री. बापुराव दडस यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि श्रीकृष्ण शिंदे पोलीस मदत केंद्र बुर्गी, पोउपनि संदिप व्हेसकोटी व पोमके बुर्गी येथील पोलीस अंमलदार यांच्या टिमने केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here