पक्षाच्या वाढीसाठी ज्येष्ठ कार्यकर्त्याचे योगदान मोलाचे,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांचे प्रतिपादन

113

पक्षाच्या वाढीसाठी ज्येष्ठ कार्यकर्त्याचे योगदान मोलाचे,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांचे प्रतिपादन

भाजपाच्या वतीने ज्येष्ठ कार्यकर्ता स्नेहभोज व सुसंवाद कार्यक्रम

गडचिरोली :- दि.१८ जुन  :-भारतीय जनता पार्टीला वाढविण्याचे काम जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केले त्या काळात कोणत्याही सोयी- सुविधा नसतांना पायदळ फिरून दऱ्या, सतरंज्या व खुर्च्या उचलून भारतीय जनता पार्टी वाढविण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. भारतीय जनता पार्टीच्या प्रारंभीच्या काळात ज्या कार्यकर्त्यांनी भाजपाला वाढविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले तसेच भाजपची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवली व संघटन म्हणुन काम केलं त्यामुळे भाजप हा आज जगात एक नंबरचा पक्ष झालेला आहे. जेष्ठ कार्यकर्त्याच्या व आज काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांच्या अमूल्य योगदानामुळेच भारतीय जनता पार्टी जगामध्ये सर्वात मोठी राजकीय पार्टी बनली आहे. जेष्ठ कार्यकर्त्यांमुळे भाजपा पक्ष वाढला, त्यांनी केलेल्या संघटनेमुळे जगामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. ज्येष्ठ कार्यकर्त्यामुळे भाजपा आज मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळे त्यांचा आदर, मानसन्मान करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी केले.भारतीय जनता पार्टीच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील जुण्या जाणत्या व ज्येष्ठ कार्यकत्यांचे ‘स्नेहभोज व सुसंवाद सम्मेलन’ कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार भवन गडचिरोची येथे करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने मंचावर मा.अशोकजी नेते खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती मोर्चा.मा.डॉ.देवरावजी होळी,आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, रमेशजी भुरसे, ज्येष्ठ कार्यकर्ते कार्यक्रमाचे समन्वयक,रविंद्र ओल्लालवार जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्रमोद पिपरे जिल्हा महामंत्री, श्री. प्रशांत वाघरे जिल्हा महामंत्री, , प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा,प्रणयजी खुणे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, योगिता पिपरे माजी नगराध्यक्षा तथा महिला आघाडी जिल्हा प्रभारी,रामरतन गोहणे तालुकाध्यक्ष,मुक्तेश्वर काटवे शहराध्यक्ष,शशिकांत साळवे धानोरा तालुकाध्यक्ष, दिलिप चलाख चामोर्शी तालुकाध्यक्ष, मारोतराव ईचोडकर माजी प.स.सभापती,विलास पा. भांडेकर संपर्क प्रमुख,जिल्हा उपाध्यक्ष अरुण हृरडे, विलास देशमुख उपसभापती तसेच मोठ्या संख्येने जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी केंद्र शासनाच्या विविध योजनांची संपूर्णपणे माहिती देत,जेष्ठ कार्यकर्ता स्नेहभोज व सुसंवाद संमेलनाप्रसंगी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन विलास पा.भांडेकर व प्रास्ताविक रमेश जी भुरसे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here