खासदार अशोकजी नेते यांची महादेवगड पहाडी सार्वजनिक देवस्थान आरमोरी तालुक्यातील पळसगांव-अरततोंडी येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सवा निमित्ताने भेट

79

खासदार अशोकजी नेते यांची महादेवगड पहाडी सार्वजनिक देवस्थान आरमोरी तालुक्यातील पळसगांव-अरततोंडी येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सवा निमित्ताने भेट

 

धार्मिक कार्यक्रमा च्या माध्यमातून आचार,विचार, संस्कारांची निर्मित होते.खासदार अशोकजी नेते

Armori आरमोरी: महाशिवरात्री यात्रा महोत्सवा निमित्ताने

आरमोरी तालुक्यातील महादेवगड पहाडी सार्वजनिक देवस्थान पळसगांव-अरततोंडी (जुनी), डोंगरगांव( हलबी) येथे खासदार अशोकजी नेते यांनी भाविक भक्तांना संबोधित करतांना मागील दोन वर्ष कोरोणाच्या महामारी ने यात्रा भरली नाही. पण दोन वर्षांनंतर या वर्षी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हरहर महादेवाच्या गजरात मोठ्या संख्येने महादेवगड पहाडी येथे आनंदात, उत्साहाने यात्रा भरली याचा आनंद या क्षेत्राचा खासदार म्हणून भाविक भक्तांना मनापासून, हृदयातून, अंतकरणातून, महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो.

 

या यात्रेला तालुक्यातील च नाही तर अनेक गावा गावातुन जागृत भगवान महादेवाचे महादेवगड पहाडी येथे दर्शन करण्यासाठी विविध भागांतून काना कोपऱ्यातील भाविक भक्त येत असतात.या यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांना अडीअडचणी च्या होणाऱ्या त्रासाबद्दल ज्याप्रमाणे रास्ते, वीज, पाणी,ईत्यादि व्यवस्था याकडे सुध्दा गांभीर्याने लक्ष देऊन पुरेपूर सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.

असे प्रतिपादन या यात्रे प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी भाविक भक्तांना केले.

 

याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांचे देवस्थानातील ट्रस्ट च्या मंडळातील लोकांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तसेच आरोग्य शिबिर, आरोग्य तपासणीचा मोफत शिबीर आयोजित करून याचा लाभ यात्रेतील अनेक भाविक भक्तांनी घेतला.

 

यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,आमदार कृष्णाजी गजबे,संपर्कप्रमुख सदानंदजी कुथे,देवस्थानचे अध्यक्ष पुंडलिक घोडाम,उपाध्यक्ष श्रीराम ठाकरे, मनोहरजी बनसोड साहेब,अविनाश बनसोड,बुध्दे साहेब,दुर्वास नाईक

सहसदस्य,वनमालाताई पुस्तोडे उपसंरपच्या,पुस्तोडे सर तसेच मोठ्या संख्येने भावीक भक्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here