
आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत रवी अरसोडा येथे वाघाची दहशत कायमव न विभागाने तत्काळ वाघास जेरबंद करावे.खासदार अशोकजी नेते

दिनांक ११ ऑक्टोबर २०२२
आरमोरी :-आरमोरी वनपरिक्षेत्र अंतर्गत रवी अरसोडा येथील आज सकाळी ७.३० वा. च्या सुमारास शेतशिवारात शेतीच्या कामासाठी गेले असता दबाधरुन बसलेल्या पटेदार वाघाने अचानक हल्ला करून स्व.पुरूषोत्तम वासुदेव सावसागडे वय ५५ वर्ष या इसमाला जागीच ठार केले
रवी अरसोडा येथील या परिसरात वाघाने खूप धुमाकूळ घातला असून या परिसरातील आज सकाळी घडलेली घटना पकडून तिसरी घटना आहे. वाघाने शेतकरी, शेतमजूर, नागरिक यांच्यात वाघाची खूप दहशत निर्माण झाली आहे.त्यामुळे या वाघाला त्वरीत लवकरात लवकर जेरबंद करा.अशी सुचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
यासंबंधीची माहिती प्रदेश संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे यांनी दिली असता तात्काळ या संदर्भाची दखल घेऊन वाघाने ठार केलेल्या इसमाला शवविच्छेदनासाठी आणले असता ग्रामीण रुग्णालय आरमोरी येथे भेट घेऊन वाघाने ठार केलेल्या इसमाच्या कुटुबियांच सांत्वन केल
याप्रसंगी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, प्रदेश संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, युवा मोर्चाचे ता.अध्यक्ष पंकज खरवडे तसेच अनेक पदाधिकारी व गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.