अखेर गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अथक प्रयत्नांना यश

57

अखेर गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू  MLA Dr.devrao holi   आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अथक प्रयत्नांना यश

 

हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रश्न निकाली न लागल्यास विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलनाचा दिला होता इशारा

मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस वनमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेसह जिल्हा प्रशासन व गोंडवाना विद्यापीठाचे मानले आभार

राज्यात मागील ३ वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असल्याने विद्यापीठाच्या जमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न रेंगाळला.

गडचिरोली :-आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मागील ३-४ वर्षापासून सातत्याने गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीच्या भूसंपादनासंदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला त्यांच्या या प्रयत्नांना अखेर मिळाले असून गोंडवाना विद्यापीठाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दिनांक ७ डिसेंबर रोजी मा. जिल्हाधिकारी व गोंडवाना विद्यापीठाचे मा कुलगुरू यांच्या हस्ते शेतकऱ्याला खरेदीखत वितरण करून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे.आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी गोंडवाना विद्यापीठाच्या भूसंपादनाचा प्रश्न निकाली न लागल्यास विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या मागणीची दखल घेतल्याबद्दल मा.मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस वनमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेसह जिल्हा प्रशासन व गोंडवाना विद्यापीठाचे आभार मानले आहे.आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस तथा वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठाला ६४.८० हे आर जमिनीच्या खरेदी करिता निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र मागील ३ वर्ष राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने विद्यापीठाच्या जमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न रेंगाळत राहिला. याबाबत याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही महाविकास आघाडी सरकारने त्याची कोणतीही दखल घेतली नाही मात्र राज्यात सत्तांतर होताच परत भाजपा शिवसेना युतीची सरकार येतात पुन्हा नव्याने याचा पाठपुरावा करून जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी या संदर्भात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासन प्रशासन स्तरावर प्रयत्न केले. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या खरेदी खत वितरणाची प्रक्रिया प्रशासनाने सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here