The youth of Gadchiroli district will participate in the National Youth Festival

208

गडचिरोली जिल्ह्यातील युवक होणार राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी

The youth of Gadchiroli district will participate in the National Youth Festival

अनुप, राधिका, वृषभ, पंकज, सिद्धी यांची निवड

 

गडचिरोली : भारत सरकार च्या युवा आणि खेळ मंत्रालय च्या वतीने नेहरू युवा केंद्र द्वारा आयोजित 26 वे राष्ट्रीय युवा महोत्सव 12 ते 16 जानेवारी दरम्यान ऐतिहासिक नगरीं हुबळी- धारवड (कर्नाटक) येथे होणार असून या महोत्सवकरिता गडचिरोली जिल्ह्यातून नेहरू युवा केंद्र च्या वतीने जिल्हा युवा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप कोहळे,राधिका जुवारे, वृषभ मेश्राम, पंकज लाडे, सिद्धी उपाध्याय या युवकांची निवड करण्यात आली आहे, हे युवक राष्ट्रीय युवा महोत्सवात गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. “विकसित युवा – विकसित भारत” या थीम वर यावर्षीचे महोत्सव होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याबरोबर देशभरातील 7500 हुन अधिक युवक आणि युवतीचा सहभाग असणार आहे.

The festival will be inaugurated by Prime Minister Narendra Modi on January 12, the birth anniversary of Swami Vivekananda.

 

या महोत्सवाचे उदघाट्न स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी 12 जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  संपन्न होणार आहे. तर  कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोमई, केंद्रीय खेळ मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे. या महोत्सवात देशभरातील विविध संस्कृती, क्रीडा, पोशाख, खानपान यांचे प्रत्यक्ष दर्शन युवकांना घडवून आणण्यात येणार आहे. सोबतच विविध विषयावर मार्गदर्शन शिबीर सुद्धा यावेळी पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here