Name the ward as Mata Ramai Bhimrao Ambedkar Nagar Ashish Sunatkar

116

माता रमाई भीमराव आंबेडकर नगर म्हणून वार्डाला नावं द्या

Name the ward as Mata Ramai Bhimrao Ambedkar Nagar Ashish Sunatkar

नगराध्यक्षा रोजा करपेत यांच्याकडे गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली मागणी

 

अहेरी  Aheri-Gadchiroli – नगर पंचायत अहेरी अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक १६ चेरपल्ली येथील चिन्ना सुनतकर यांच्या घरासमोरील चौकाला माता रमाई भीमराव आंबेडकर नगर असे नावं देण्यात यावे म्हणुन नगर पंचायतीचे नगराध्यक्षा रोजा करपेत यांच्याकडे वॉर्डातील नागरिकांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

प्रभाग क्रमांक 16 चेरपल्ली मद्ये चार मोठें वॉर्ड आहेत, त्या वार्डांना नाव नसल्याने नागरीकांना पोस्टाद्वारे येणारे पत्र, ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर केलेले साहित्य व इतर शासकीय, खाजगी नोटिस पूर्ण पत्ताची माहिती नसल्याने अनेक दिवस लोटूनही त्या व्यक्ती पर्यंत पोहचत नाहीत, यामुळे वेळेवर पत्र मिळत नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच वेळेच्या आत मधे नोटिस धारकांना नोटिस मिळत नाही व काहीं सूनवणी किंव्हा इतर ठिकाणी वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांच्या नावावर कारवाई करण्याची नोटीस बजावत आहेत, त्यामुळें येथील चार वार्डांपैकी पहिल्या वॉर्डांतील चिन्ना सुनतकर व कोंडू कांबळे यांच्या घरासमोरील चौकाचे नाव नसल्याने माता रमाई भीमराव आंबेडकर असे नाव देण्यात यावे. जेणे करून नागरीकांना शैक्षणीक व खासगी कामाकरीता कायमस्वरुपी पत्ता टाकतांना अडचण निर्माण होणार नाही, अशी मागणी नगराध्यक्षाकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.

यावेळी वॉर्डातील आशिष सुनतकर, दीपक सुनतकर, राहुल रामटेके, अर्चना रामटेके, रोशन सुनतकर, नारायण बोरकुटे, पंचफुला रामटेके, सोना सुनतकर, नारायण रामटेके, शंकर सुनतकर, जयंतराव कांबळे, राजू कोंडागुर्ले, संदीप कांबळे, अरुण सुनतकर, अरुण रामटेके आदी नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here