
गडचिरोली शहरात संत गाडगेबाबा यांना अभिवादन .-

Gadchiroli:- गडचिरोली शहरातील स्थानिक इंदिरा गांधी चौकात आज २० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री संत गाडगे बाबा स्मृती संस्था व परीट, धोबी, वरठी सेवा संघटना जि. गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने अभिवादन करण्यात आले. यावेळी गडचिरोली नगर परिषदेचे माजी सभपती तथा महाराष्ट्र राज्य परिट, धोबी, वरठी सेवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय गोरडवार यांचे हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे माल्यारपण व दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले. त्या नंतर उपस्थित सर्वांनी गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संतोष आकणुरवार जिल्हा अध्यक्ष धोबी संघटना जि गडचिरोली,मोरेश्वर मानपल्लिवार सचिव धोबी संघटना जि. गडचिरोली, प्रभू रोहनकर युवक धोबी संघटना जि. गडचिरोली.सुभाष रोहनकर ज्येष्ठ कार्यकर्ते धोबी समाज संघटना,पी. जी. राहुलवार ज्येष्ठ कार्यकर्ते धोबी समाज संघटना, , दिवाकर ताजने ज्येष्ठ कार्यकर्ते धोबी समाज संघटना,भास्कर केलझळकर, साई कोंडावार, अरुण केलझरकर,अशोक कोल्हटवार, विकास तरमनवार, राजू कंठीवार, माणिक केलझरकर,सुरेश तुंगीडवार, अरविंद मादेशवार, नितीश केळझरकर,गजानन कुद्रकवार, मयुर दासरवार, अनिल म्हशाखेत्री, प्रमोद गडपायले, गणपत येलमुलवार, प्रमोद ताडपल्लिवार, अनिता कोल्हटवार महिला धोबी समाज संघटना जिल्हाध्यक्षा, लता वरघंटे महिला धोबी संघटना जि.उपाध्यक्षा, तृप्ती गोरडवार, सुनंदा गोरडवार, नंदा नल्लुरवार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.