Regarding supply of mini tractors and its accessories to self-help groups of Scheduled Castes and Neo-Buddhists

59

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणेबाबत

 

गडचिरोली,(gadchiroli)दि.11: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.एटीटीएस-2016/प्र.क्र.125/अजाक दि. 08 मार्च 2017 नुसार “अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणे” या योजनेत अमुलाग्र बदल करण्यात आला असून सदर योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटाना देण्यात येणारे (अर्थसहाय्य) हे वस्तु स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्याची जास्तीत जास्त रक्कम रु. 03.15 लाख बचत गटांच्या आधार सलंग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहे. स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवास असावे. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न असावे. स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्यांचे आधार ओळखपत्र. स्वयंसहाय्यता बचत गटाने खरेदी केलेा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही भारत सरकारचे (Ministry of agriculture & farmers welfare department of agriculture co-operation and farmers welfare.) यांनी निर्धारित केल्यानुसार फार्म, मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टींग इन्स्टीटयुट यांनी टेस्ट करुन जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार (Specification) असावेत.

 

पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांना शासनाने निश्चीत केलेल्या दरानुसार अर्थसहाय्य मंजूर करुन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्याला त्यांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. स्वयंसहाय्यता बचत गटाने खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर व उपसाधने अर्थसहाय्य घेतल्यानंतर सदर मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व उपसाधने विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. तशा आशयाचे हमीपत्र स्वयंसहाय्यता बचत गटाना दरवर्षी 10 वर्षापर्यंत दयावे लागेल. ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी पावर टिलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला आहे, त्या बचत गटांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी अधिक माहिती करीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयाशी 07132-222192 या संपर्क क्रं.वर संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त असे समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here