अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेशाबाबत
Regarding admission of Scheduled Tribe students to reputed residential schools of English medium in the city
गडचिरोली,(Gadchiroli)दि.26: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र 2023-24 करीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा व दिनांक 01 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत जन्मलेला असावा. विद्यार्थ्याचा पालक शासकीय /निमशासकीय नोकरीत नसावा व त्याचे वार्षिक उत्पन्न रूपये दोन लक्ष पेक्षा कमी असावे. या योजने अंतर्गत आदीम जमाती /दारीद्रय रेषेखालील /विधवा/ घटस्फोटित व निराधार यादीतील पाल्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. इयत्ता 1 ली प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. इयत्ता 1 ली प्रवेशासाठीचे अर्ज प्रकल्प कार्यालय गडचिरोली तसेच प्रकल्पांतर्गत नजीकच्या शासकिय/अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध होतील अथवा स्विकारले जातील. प्रवेशासाठीचे आवेदन पत्र आवश्यक कागदपत्रांसह दि.31 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्यात यावे. अधिक माहितीसाठी संतोष कन्नाके, क.शि.वि.अ., मो.क्र.9422700623 यांचेशी संपर्क साधावा, असे सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांनी कळविले आहे.