Only a great orator can lead well says BJP District General Minister Pramod Pipre

59

उत्कृष्ट वक्ताच चांगले नेतृत्व करू शकतो भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन

अटल युवा पर्व अंतर्गत स्वामी विवेकानंद महाविद्यालय, गडचिरोली येथे वक्तृत्व स्पर्धा

Only a great orator can lead well says BJP District General Minister Pramod Pipre

गडचिरोली :- दि 26/12- gadchiroli :- देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी हे एक कुशल वक्ते, संसदपट्टू साहित्यिक व कवी म्हणून सुपरिचित होते . त्यांच्या कार्यकाळात कित्येकदा ते खासदार म्हणून निवडून आले व त्यांनी देशसेवा करण्याचा संकल्प केला. श्रद्धेय अटलजींनी प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पक्षासाठी काम केले व भारतीय जनता पार्टीचे कार्य वाढविण्यासाठी व पार्टीला पुढे आणण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले व त्यांनी त्यावेळी केलेल्या चांगल्या उत्कृष्ट कार्यामुळेच आज भारतीय जनता पार्टी यशोशिखरावर पोहोचलेली असून त्यांचे विचार व कार्य आजही देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी समोर चालवीत आहेत व देशाला विकासाच्या वाटचालीकडे अग्रेषित करीत आहेत. जो चांगले बोलू शकतो व चांगली वक्तत्वे करू शकतो तोच खरा चांगले नेतृत्व करू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगलं वक्तव्य करणे शिकायला हवे व चांगले नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घ्यावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आजवर अनेक युवक युवती घडलेली असून पुढील काळातही या माध्यमातून चांगले सुसंस्कृत व हुशार विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी केले. वकृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे म्हणाले, विद्यमान घडामोडींची माहिती, सर्व विषयाचा सखोल अभ्यास व प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान असलेल्या व्यक्तीलाच आपण चांगली व्यक्ती व उत्कृष्ट वक्ता म्हणू शकतो भारतात अनेक वक्ते होऊन गेले मात्र स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील धर्म परिषदेतील मार्गदर्शनाने जगातील अनेक विद्वान , पंडित, धर्मगुरू व धर्मग्रंथांचे अभ्यासक यांनी भारतीय संस्कृतीला सर्वोच्च मानले व स्वामी विवेकानंदाच्या जयजयकार केला. विश्व बंधुत्वाची संकल्पना आपल्या भारत देशात असून भारतीय संस्कृतीच सर्व जगात सुपरिचित व प्रसिद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रशांतजी वाघरे यांनी केले.भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली च्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे अटल युवा पर्व कार्यक्रमा अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन आज दि 26 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत जी वाघरे ,किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, भारतीय जनता युवा मोर्चाचे गडचिरोली जिल्हा प्रभारी अनिल डोंगरे, आदिवासी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, अनिलजी तिडके प्रा. सतीशजी चिचघरे ,वकृत्व स्पर्धेचे परीक्षक प्रा. स्वरूप तारगे व प्रा. चडगुलवार सर प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेसमोर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर वकृत्व स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वकृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अटल बिहारी वाजपेयी व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला वकृत्व स्पर्धेत विजय स्पर्धकांना प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार चषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक गडसुलवार सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here