Organized by Pandit Dindayal Upadhyay Employment Fair

108

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

Organized by Pandit Dindayal Upadhyay Employment Fair

गडचिरोली,(Gadchiroli)दि.26: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.29 डिसेंबर 2022 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी, येथे पंडीत दिनदयाल रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.

सदर रोजगार मेळाव्याकरीता इच्छुक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांची झेरॉक्ससह स्वखर्चाने दि.29 डिसेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली,व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी, या कार्यालयाने केले आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावा. दुरध्वनी क्रंमाक 07132-222368 हा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here